घर कावळ्याचे
घर कावळ्याचे
कावऴ्याला काही, सुगरणीची सर येत नाही|
आयुष्यात त्याला नीट, बांधता घर येत नाही|
बेडकांने कराव्या डबक्यात, वल्गना कितीही
गरुडभरारीचे त्याला, कधीही पर येत नाही |
आम्ही आयुष्यभर सदा, केली तयाची याचना
आमच्या उपासनेला, कधी का फऴ येत नाही|
पूरात वाहून गेलं, शेतक-याचे घर रात्री
त्याच्या मदतीला धावत, का ईश्वर येत नाही|
स्वातंत्र्यानंतर आम्ही जी, केली होती कल्पना
स्वप्नातील ते शहर, आता का नजर येत नाही|
गिरवल्या पाट्या त्यांनी,आयुष्यभर कितीही
गुरूजींसारखे कधीही, त्यांचे अक्षर येत नाही|
