STORYMIRROR

Dr. Dharmendra Mulherkar

Others

3  

Dr. Dharmendra Mulherkar

Others

आडिखे

आडिखे

1 min
27.5K


दावे त्याचे खोकले कसे

यावे मी ते मोकळे कसे?

जाणले ना तू मला कधी

आडाखे तू बांधले कसे?

चाललो मी निरंतर असा

सांग तू मला रोखले कसे?

आरोप तुझे ,फैसले तुझे

न्यायाला असे विकले कसे?

बांधू नका हवेत इमले

ऊंचीवरुन ते पडले कसे?

मठात असे त्या दडले काय

अध्यात्म असे बिघडले कसे?

धर्माक्षरांनी केला गोंधळ

शास्त्र त्यांनी सोडले कसे?

(धर्माक्षरे)


Rate this content
Log in