सुख नसते एकटे
सुख नसते एकटे
स्वप्न पाहिले मी परीचे
यावी आपसुक भेटी
सुंंदरतेचा ध्यास जीवनी
परी संकटे गाठी
का मज हव्यास असावा
कष्टाविण जगण्याचा
तरीही निरंतन वाटे मजला
मिळो सौख्य परिघाचा
सुख नसते कधी एकटे
सोबत दु:ख किनार
म्हणून सुखाची वाढे महती
अन स्वप्नात आधार

