भिती
भिती
जगी काय हे उठले वादळ
कसे माजले इतके तांडव
निष्ठुर कसा तू झाला देवा
उखडून आमुच्या आशेचे मांडव
कसा कोठूनी आला व्हायरस
आमंत्रण देतो कसा यमाला
रस्ते, गल्ल्या ओस पडूनी
घाबरवितो तो आता भितीला
किड्यापरी हे माणूस मरती
देहाचे ढिग क्षणाला चढती
अंत नको तू देवा पाहू
थांबव तांडव अन दृष्ट ती मती
माणूस, सुंदर शिल्प निर्मिले
भितीने आज तेच घेरले
वाचविण्या त्या सुंदर शिल्पा
क्षमा तू करुनी संपव सगळे
क्षमाशीलता अंगी बाणून
मीही करेन शिस्तीचे पालन
अंतर ठेवून दोघांमधले
मास्क लावून धरा वाचवेन
