सदभाव
सदभाव
1 min
239
ओठामध्ये त्या रामाचे नाव सदोदित
पायाशी त्या वसते माझे गाव सदोदित
आईबापा देव मानुनी पुजतो जो तो
स्वर्ग खरेतर तिथेच वसतो.. भाव सदोदित
मौनालाही उत्तर असते मौनामध्ये
त्या शांतीचा मनात असतो ठाव सदोदित
कुणीकुणाला,हरवावे वा, जिंकत जावे
खेळ मांडला,नियतीने समजाव सदोदित
मंतरलेले दिवस आता जगता जगता
मनासारखे खेळत जावे डाव सदोदित
जगणे व्हावे जीवन गाणे आनंदाचे
घालत असते ही दुनिया तर घाव सदोदित
बुध्दी दिधली या देवाने अदभूत भेट
त्या देवाला अर्पावा सदभाव सदोदित
