STORYMIRROR

Mansi Joshi

Others

3  

Mansi Joshi

Others

मन

मन

1 min
12K

सागर असतो अथांग तरीही

धडकेने लाटेस उसळतो

खळबळ करुनी अंतरंगी तो

पकडून, जखडून तिला ठेवतो

आकाशी विहरता पाखरे

म्हणती आपले विशाल अंगण

चंद्र तारका टिमटिम करती

नक्षत्रांना दिधले आंदण

देहामध्ये होते जेव्हा

कधी कधी गुलबक्षी सळसळ

देहाहुनही मला वाटते

मनातले मन हे अवखळ !!

विचारातल्या मनात राहे

नियतीचे हे सुरेख कोंदण

मन हलके अन अवखळ भारी

तोडून पळते सगळे रिंगण

तोडून बघते सगळे रिंगण


Rate this content
Log in