STORYMIRROR

Mansi Joshi

Others

3  

Mansi Joshi

Others

ऊनसावली

ऊनसावली

1 min
279

बेचव दुनिया फक्त सुखाची दु:खाने गोडी वाढे

दु:खानंतर येता सुख ते, जगण्याला मग रंग चढे


जीवन म्हणजे सुखदु:खाचे नाजूक विणले वस्त्र

जरीकिनारी आठवणींची सुरेख गुंफण असते मात्र

सुख म्हणजे आनंद मनीचा, सूर दाटती उरी

दु:ख निचरा करीते आपुल्या उद्रेकाचा तरी


आस सुखाची सदैव असते माणसास जीवनी

मनसारखे नसेल तर ही कटुता दाटे मनोमनी


सुख वाटे निरस परीही सुखदु:खाची अविट जोडी, 

दु;खानंतर निरभ्र होते आकाशाची अथांग गोडी


 दु:खानंतर येता सुख ते,जगण्याला मग रंग चढे

जुनीच नाती पुन्हा नव्याने खुलणारी ही प्रित गडे


घट्ट विणाया नाती करती दु:खाशी तडजोड कधी

रुसवे,फुगवे संसाराची हिरे माणके ठरतील मधी


उभाआडवा धागा विणूनी सुखदु:खाचे वस्त्र घडे

बेचव दुनिया फक्त सुखाची दु:खाने गोडी वाढे


विरह,वेदना,तगमग,असूया दु:खाची अनेक रुपे

झालर दु:खाची वाढवे सुखवस्त्राचे मजबूत धागे


रात्रीनंतर दिवसाची खरी महती वाढे क्षणोक्षणी

दु:खानंतर सुख वाढवी जगण्याची नवी झिंगमनी

       

     


Rate this content
Log in