STORYMIRROR

Mansi Joshi

Others

3  

Mansi Joshi

Others

संदूक

संदूक

1 min
153

संदुक माझी माळ्यावरची

 हळूच उघडून बघताना

सोन्याचे दिन आज आठवले

 धूळ त्याची उडताना

मी लिहिलेले प्रेमपत्र ते

 धुंद मोहरून जाताना

मधले काही शब्द पुसटले

अश्रूमधे भिजताना

नव्हता तेव्हा फोन उशाशी

 नव्हते शब्दही हळवे

नजरेमध्ये प्रेम दाटले 

कधी कसे तरी कळवे

दोन शब्द ते पत्रामधले

 छातीशी कवटाळे

कुणी पाहिले चुकुन कधी

 तर पुढे उभे घोटाळे

आज एकटा झाडाखाली

मुकाट भूत होत प्रेमाचे

तु नसताना समोर ठेवून

 पत्र तुझे मी वाचे

मोहरलेले, क्षण होते ते

आठवात रुतलेले

आज राहिले बनून संदूक 

आसवात भिजलेले


Rate this content
Log in