सखा
सखा
वेणू वाजविताना तो
धुंद होऊन गेला
राधेच्या स्वप्नामधूनी
हलके डोकावून आला
काजळ काळी रेघ
डोळ्यावर रेखिव होती
सावळ्या त्या दर्शनाने
मनमोर फुलवित आला
इंद्रधनुषी त्या क्षितीजावर
लाटांच्या उंच कमानी
सावळा निळसर ओला
तो रंग सोडूनी गेला
आकाश भरुनी निळाई
लपला सोन्याचा ग
ोळा
मनमोहन शामल मेघी
सांज मंतरुन गेला
मिणमिणत्या कातरवेळी
आसमंत होई सावळा
बासरीच्या सुरामधूनी
उब मनास देऊन गेला
गजबजल्या या दुनियेत
मज शाम एक भेटला
अस्थिर मन लाटेवर
तो फुंकर मारुन गेला
ती धुंद सावळी सांज
आकाश निळाई प्याले
हळव्या त्या कातरवेळी
मोरपीस फिरवूनी गेला.