खिडकीतून दिसणारी आकृती
खिडकीतून दिसणारी आकृती
दोघं बसले खिडकीपाशी, हातात वाफाळता चहा होता..
आसुसलेल्या नजरेत मात्र त्याचाच चेहरा नाचत होता..
निस्तेज सुरकुतलेल्या चेहर्यांवर दुःखाची पसरली होती छटा..
अश्रू आटलेल्या डोळ्यांना येऊन थडकत होत्या नैराश्याच्या लाटा..
का गेला असेल सोडून तरणाताठा मुलगा एकुलता..
प्राण त्याने समर्पित केले करता करता देशसेवा..
शेवटचा हात हलवून याच खिडकीतून निरोप घेतला..
कुठे ठाऊक होते न परतण्यासाठीच तो निघत होता..
आता कुणी येणार नव्हते, वाट बघायला लावणार नव्हते..
कितीही कुणी समजावले तरी ज्याचे जळते त्यालाच कळते..
भरलेल्या घरात अचानक पसरलेली भयाण शांतता जीव घेत होती..
दोघांना मात्र तिन्ही त्रिकाळ खिडकीतून त्याचीच आकृती दिसत होती..
