अधुरे प्रेमगीत
अधुरे प्रेमगीत
शब्द ओठांवर आले
तुला कळले कसे नाही
भावनांचे खेळ हे सगळे
तुला कसे समजले नाही
ठाव मनाचा तुझ्या
घेता येईल का कधी
थरथरणारे ओठ तुझे
भावना बोलतील का कधी
निशब्द होते तू जेव्हा
मलाही बरेच बोलायचे असते
सुर दाटतात माझ्याही मनी
गीत तुला नको असतें
हुंदका बनून कधी तू
गळी दाटशील माझ्या
नसता जवळ सजणे तू
आठवणीं राहील तुझ्या
हाक देणाऱ्या शब्दांना
साद तू देत राहा
कोलमडून पडेल नौका माझी
किनारा तू बनत राहा