STORYMIRROR

Ganesh Gavhle

Tragedy

3  

Ganesh Gavhle

Tragedy

आसवांचे प्याले..

आसवांचे प्याले..

1 min
28.1K


दुःख झाले मनास सोडून अनेक गेले

गुंतलेले सुर नकळत छेडुन गेले

मनातील पारव्यांचे गुंजन मनातच राहिले कितिदा

बोलक्या पोपटापरी माझे कधी न झाले

कितीदा आसवांचे प्याले मी ही रिते केले...

कित्येक रात्री जागुन काढल्या

रक्ताच्या होळ्या खिडकीतून पाहिल्या

अब्रु वेशीवर टागताना मी अश्रु ढाळले

निरपराधांच्या समाधीवर फुले वाहीले

कितीदा आसवांचे प्याले मी ही रिते केले...

भरकटलेल्या नावेला पैलतीरी नेताना

उसळलेल्या लाटांसमोर हतबल होतांना

सर्वस्व मी सागराला अर्पण केले

ध्येयाशक्ति न हरवता नावेला किनार्याला लावले

कितीदा आसवांचे प्याले मी ही रिते केले...

नात्यांचा अतुट बंध विनत गेलो

परक्यांना ही आपलं करून गेलो

ह्रदयातील लोकांनीच ह्रदयावर घाव केले

मी त्यांच्यासाठी तरी फुले उधळले

कितीदा आसवांचे प्याले मी ही रिते केले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy