स्वप्नपरी
स्वप्नपरी
वाटे मनास जेव्हा घ्यावा जरा विसावा
स्वप्नातुनी समोरी चेहरा तुझा दिसावा ।।
आरास ही तार्यांची मांडली तुजसाठी
स्वप्नांतुनी तु अवतरावे मिलनासाठी
नभीच्या तारकानी जावे झुकुनी जरा
चाहूल तुझी घेण्या येशील का मेघा जरा??
आसमंत होउनी मी बाहु पसरावे
शशी परी मुख तुझे डोळ्यात साठवावे
वाटे आज मिठीत तुला घ्यावे
दुर तिथे माझा स्पर्श तुला जाणवे
डोळ्यातील भाव तुझ्या ओठांतुनी उतरावे
चातकापरी मी ते अलगद झेलावे
द्यावे झोकुनी तुही व्हावे सम मला
मिठीत तुझ्या फुलावा चैतन्याचा सोहळा
अंधार्या त्या रात्रीला शशी होईल साक्षीला
मोगर्याचा सुवास येईल का सोबतीला?
प्रेमाच्या नावेतून जाऊया पैलतीरी
होतील बेधुंद अन् बरसतील का प्रेमसरी??
मिलन आपले होता रात्रीने बेधुंद व्हावे
लाजुनी अंधाराने गालात हसावे
लागता चाहुल सूर्यकिरणांची मिठी सैल व्हावी
पहाट होण्यापूर्वी तु स्वप्नात उडी घ्यावी
वाटे मनास जेव्हा घ्यावा जरा विसावा
स्वप्नातुनी समोरी चेहरा तुझा दिसावा

