वडील
वडील
वडील
कधी आई तर कधी वडील दोन्ही भूमिकेत असता तुम्ही
मुलांचं पालनपोषण करणारे पालक असता तुम्ही
आपल्या कर्तुत्वाने मुलांच्या मनावर ठसा उमटवून
भविष्यासाठी त्यांना तयार करता तुम्ही...
वडील
घर आणि घराचे छत असतात तुम्ही
कुटुंबाचा आधार असता तुम्ही
कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला समजून घेता तुम्ही
कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याच्या सुखदुःखात सामील असतात तुम्ही
वडील
घराचा पाया असतात तुम्ही
तुमच्या खांद्यावर असतात कुटुंबाच्या अनेक जबाबदाऱ्या
प्रत्येक जबाबदारी पार पाडणारे नेतृत्व असतात तुम्ही
वडील
घराचा कळस असतात तुम्ही
घराला एका उच्च शिखरावर नेत असता तुम्ही
तुम्हीच असता घराचे खरे आधारस्तंभ
त्याग आणि निस्वार्थ समर्पणाच खरं प्रतीक असता तुम्ही
सलाम तुमच्यातल्या "बाप" नावाच्या माणसाला
