आई तुझी आठवण
आई तुझी आठवण
येता तुझी आठवण व्याकुळ मी होइ आई ।
रोज देवा बोले भेटव रे माझी आई ।।
दाटे मग पापणीतुनी हलकेच पाणी ।
पुसावयास आई तुजवीण येई न कोणी ।।
होता काक आर्जव पोटामध्ये भुकेचा ।
दुधभात कोण भरवी तुजवीन मायेचा ।।
भुक न शमे कधी ममता मज न मिळे ।
तुजवीन अश्रुंचे मी घोट रोजच गिळे ।।
नयनातुनी झोपेचे येती ढग दाटूनी गडे ।
कुशीवीन तुझ्या पापण्यांचे मिलन न घडे ।।
बाळ मी तान्हुलाच उचलुनी मज घे ।
अंगाई गीत गाण्या जरा येई तु वेगे ।।
नको मज खेळणी हट्ट न करणार कधी ।
रुसणार मी न पुन्हा तुजवरी आई कधी ।।
मी तुझी वाट इथे रोजच पाही ।
एकदाच ये ना तू परतूनी आई ।।
चोरटा तो देव चोरली माझी आई ।
गेली आहे का रुसुनी त्याचीही आई ?
चोरट्या त्या देवापरी मज नको दुसरी आई
परत जन्म घेउनी तुच हो माझी आई ।
परत जन्म घेउनी तुच हो माझी आई ।।
