भीम माझा महान
भीम माझा महान
भिम माझा लाखात एक होता
रुबाब त्याचा इतरांपेक्षा वेगळा होता
जन्माने असला गरीब जरी
ज्ञानाने तो कुबेर होता
भिम माझा लाखात एक होता
शिक्षणाचा दिप त्याने लावला होता
अनाथांचा तो नाथ होता
बहुजनांचा आधार होता
भिम माझा लाखात एक होता
मनुवाद्यांचा कर्दनकाळ होता
शोषितांच्या अन्यायाला वाचा
फोडणारा दिपस्तंभ होता
भिम माझा लाखात एक होता
बापांचा तो बाप होता
पंडितांचा महापंडित होता
जगात ज्ञानाने तो धुरंधर होता
भिम माझा लाखात एक होता
कुणाचा त्याच्यापुढे टिकाव नव्हता
शिका,संघटित व्हा,संघर्ष करा
विद्येचा महामेरू होता
घटनेचा शिल्पकार होता
सर्व भारतियांचा अभिमान होता
देशाची आण बाण शान होता
अन् खरंच भिम माझा किती महान होता
