STORYMIRROR

Ganesh Gavhle

Others

3  

Ganesh Gavhle

Others

आऊसाहेब

आऊसाहेब

1 min
233

संस्कृती आमची छान वाढविते सह्याद्रीचा मान

जिजाऊ तुमच्या कुशीत जन्मले शिवशंभो रत्न महान


दावुनी स्वराज्याचं स्वप्न घडविला इतिहास नवा

शिवराज्य उभं राहिलं भगवा फडकविला जवा


सह्याद्रीची रणरागिनी तू महाराष्ट्राची वाघीण

महाराष्ट्राचा प्रत्येक मावळा झुकवितो तुझ्यासमोर मान


सह्याद्रीच्या कडेकपारीतून गुंजतो हर हर महादेवचा किंकार

प्रत्येक मावळ्याच्या तलवारीची तुम्हीच होता ढाल 


शपथ स्वराज्याची जिजाऊ उपकार तुझे विसरणार नाही

महाराष्ट्राला तुजसारख्या रणरागीनीशिवाय पर्याय नाही


स्वराज्याच्या कणाकणासाठी कित्येकांनी दिधले प्राण

आऊसाहेब तुम्हांस मुजरा करूनी गणेश गव्हले गातो तुमचे गुणगान


Rate this content
Log in