मुकनायक..
मुकनायक..
शोषिताना जवळ करूनी
मायेची उब त्याने दिली
बुरसटलेल्या समाजाला माणुसकीची
किनार दावीली
जातीयतेचे शमवूनी वादळ
मनुला त्याने मातीत गाडला
समतेचे उठवुनी वादळ
बहिष्क्रूत भारत त्याने घडविला
हिमालयापरी तटस्थ राहुनी
मनुवाद्यांचा कर्दनकाळ तो ठरला
माणुस म्हणून नाकारलेल्यांना
जगण्याचा हक्क दिला
शतकानुशतके गुलामीच्या अंधार्या खाईत
निपचीत पडलेल्या समाजाला
शिक्षणाचा दिपस्तंभ दिला
गुलामाला गुलामीची जाणीव करून
तो खरा "मूकनायक "ठरला
