आठवणीतील बाप
आठवणीतील बाप


सकाळी उठून जेव्हा मी,
सूर्याला नमन करतो
तेव्हा कोलम सूर्य किरणात,
मला माझा बाप दिसतो
न्याहरीला असते शिळी,
भाकरी अन् थोडे दूध
भाकरीच्या तुकड्यात,
मला माझा बाप दिसतो
शेजारील बाळ तान्हुला,
बघुनी मला गोड हसतो
तान्हुल्याच्या निरागस हास्यात,
मला माझा बाप दिसतो
परसातील आंब्याचा वृक्ष,
आजही जेव्हा जेव्हा बहरतो
आंब्याच्या मनोहर बहरात,
मला माझा बाप दिसतो
देव्हाऱ्यातील देवाची नित्य,
पूजा-अर्चा मी करतो
देवाच्या मूर्तीतही मला,
मला माझा बाप दिसतो
एक तप उलटून गेले,
बाप माझा देवाघरी वसतो
आकाशातील चादण्यांत,
मला माझा बाप दिसतो