अस्तित्व...
अस्तित्व...
1 min
238
कस्तुरीचा मृग बनुनी,
सुगंधाच्या मागे पळतं होतो.
समईतील वात बनुनी,
प्रकाशासाठी जळतं होतो.
शब्दांचा मांडून पसारा,
जीव त्यांच्यात ओततं होतो.
अशक्यप्राय गोष्ट असूनही,
शब्दात अस्तित्व शोधतं होतो.
काळोख्या रात्रीच्या अंधारात,
सावलीचा माग होता.
माझ्यात माझाच शोध घेणे,
अस्तित्वाचा भाग होता.
सुखाच्या मृगजळामागे,
जीवनभर पळतं होतो.
तुटलेल्या स्वप्नांच्या निखाऱ्यात,
अनाहुत पणे जळतं होतो.
सुकलेल्या फुलांना पाहून,
रहस्य जीवनाचे उलगडले.
चितेवर जळतांना अखेरीस,
उत्तर अस्तित्वाचे सापडले.
