धास्ती
धास्ती
सन्मार्गाला कलियुगाच्या दुष्टपणाची धास्ती,
जीवनाला यमराजच्या आगमनाची धास्ती
विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या शिस्तीची धास्ती,
चोरादारांना पोलिसांच्या गस्तीची धास्ती
नोकरीला घरच्यांच्या उंच अपेक्षांची धास्ती,
नोकरीनंतर मिळणार का छोकरी, धास्ती
खिशाला पैशांची, पैशाला खर्चाची, धास्ती
मेट्रोच्या गर्दीची, immunity ला सर्दीची, धास्ती
बाळाला पाळण्याची, चहाला गाळण्याची, धास्ती
खाल्ल्यावर पण, प्यायल्यावर पण, धास्ती
ट्रेन पकडण्याची, नाहीतर सुटण्याची, धास्ती
पर्फाॅर्मन्स देताना "मिळणार का प्रमोशन?", धास्ती
एकटं पडल्यावर "लोक आपल्याला विसरणार का?", धास्ती
सुनेला अॅप्रूव्हलची, सासूला अॅक्सेप्टन्सची, धास्ती
मुलं आणि मशीन्स, कधीही बिघडण्याची, धास्ती
विजेची तार कधीही सटकण्याची धास्ती
बॉसच्या लहरींची, निसर्गाच्या कहरींची, धास्ती
टिफीन नाही तर चार्जर विसरण्याची, धास्ती
आजाराला हॉस्पिटलची आणि सर्जरीची, धास्ती
प्रेमाला दुनियेची आणि दुश्मनांची, धास्ती
कंप्युटर्सना हॅकर्सची, हॅकर्सना अटकेची, धास्ती
धास्ती... धास्ती... धास्ती...
