रेशीमगाठ
रेशीमगाठ


तिचा घेऊन हाती हात चढलो बोहल्या वरती
सुखाने घालती पिंगा मनाचे मोर मजभवती।।१।।
किती विश्वास माझ्यावर तिचा मज हात देताना
तिच्या सुकुमार देहाचा दिला अनमोल नजराणा।।२।।
असावे वाटते अधुरे तिच्या वाचून हे जीवन
तयासाठीच बनलेले जणू हे रेशमी बंधन।।३।।
जमवले आप्त जेष्ठांना विवाह सोहळ्या साठी
शुभाशीर्वाद गरजेचे तयांचे जीवनासाठी।।४।।
तिच्या माझ्या विवाहाचा अनोखा सोहळा झाला
ढगांची जाहली गर्दी नभी जल्लोष करण्याला।।५।।