वेळ
वेळ


प्रॉम्प्ट-१३ साठी
टाळू नये कुणा दिलेली, वेळ कुणाची घेतलेली।
असते घटिका महत्वाची प्रत्येकाच्या जीवनातली।।१।।
घेणे देणे नसे कुणाला, कोण कुणाचा, ठाऊक नाही।
आलेला क्षण निघून जातो कोणा साठी थांबत नाही ।।२।।
हाती कुणाच्या काहीच नसता किती मीपणा सर्वांठायी।
जीवन शर्यत जिंकण्याची झाली सर्वांना किती घाई।।३।।
नित्य नेम धरून जीवनी वेळे सोबत चालत जावे ।
जीवन सुकाणू योग्य तऱ्हेने वेळे सोबत हाकत न्यावे।।४।।
वेळ प्रसंगी कधी कुणावर वाईट वेळ कधीही येते।
माहीत नाही कधी कुणाची वेळ जराशी फिरकी घेते।।५।।