आयुष्याच्या वळणावर
आयुष्याच्या वळणावर
1 min
501
ध्येयदिशेने चालत जाते गाडी आयुष्याची
प्रवासात कधी पर्वा नसते ऊन पावसाची
मार्ग चालता सुख दुःखाचे चढ उतारही येती
कशी बदलते दिशा अचानक ठप्प होते गती
बालक्रीडांच्या दवबिंदूंनी सकाळ ओलावते
तारुण्याच्या नशेत सर्रकन् दुपार निघून जाते
कातरवेळी काळजीने मन होते कातर कातर
ओसरते मग जीवन आणि मरणा मधले अंतर
लेखा जोखा आयुष्याचा हिशेब पुढे मांडतो
त्या वळणावर जुन्या स्मृतींचे गाठोडे सोडतो
