रिक्त हस्तेच जाणे
रिक्त हस्तेच जाणे

1 min

550
प्रॉम्प्ट-१८ साठी
उपयोग काय तुजला गादी, पलंग, उशीचा
गेला निघून आत्मा पिंजरा जळे कुडीचा
आहे जिवंत तोवर धडपड साऱ्या जगाची
एका क्षणात तुटते दोरी या आयुष्याची
येथेच राहुनी जाते ते सारेच जमविलेले
जाते समयास कोणी सवे आजवर नेले?
येतो रित्या कराने, जाणेही रितेच आहे
भले बुरे कर्म इथले सोबत करीत राहे
नरजन्म लाभला हा मोठ्याच नशिबाने
सत्कर्म आचरणाने कर जीवनाचे सोने
वस्तू निर्जीव साऱ्या कर त्याग मुक्त मनाने
घे मोक्ष प्राप्त करुनी संतांच्या सत् संगतीने