हात कोवळे
हात कोवळे
प्रॉम्प्ट-१५ साठी
हात कोवळे
बागडायचे, वय खेळायचे,
बालकांचे बालहात कोवळे
दुष्काळाच्या झळा सोसूनि
गरिबीने बघा कसे करपले।।१।।
पाटी पेन्सिल जिथे असावी
त्या हातामध्ये कुदळ यावी
जीव तोडुनि काम करावे
भेट तेव्हा भाकरीची व्हावी।।२।।
खोपा चिमणीचा बनवावा
घर बांधणीस तो राबावा?
भातुकलीचा खेळ खेळता
खरेच का तो नशिबी यावा।।३।।
का जन्म हा गरीबा पोटी
रहावे लागते उपासपोटी
भाग्याची म्हणे असते रेषा
त्यांच्या नशिबात का खोटी।।४।।
हात रापले कष्टाने जरी
कळले आता खरे काय ते
कर्म हीच खरी पूजा असे
कर्माविना ना मिळे आयते।।५।।