थांब थांब रे पावसा
थांब थांब रे पावसा
1 min
182
थांब थांब रे पावसा
नको येऊ येड्यावाणी
अंगणात चोहीकडे
झालं आहे पाणी पाणी ।।१।।
वेळेवर आलास तू
पिके आलीय जोरात
आता उघड पावसा
आणू दे जरा घरात ।।२।।
हाता तोंडाशी आलेला
नको घास हिसकावू
सुख आलंय दाराशी
नको दूर दूर नेऊ ।।३।।
नदी नाले भरलेली
झाल्या विहिरी तुडुंब
तृप्त झाली वसुंधरा
नको आता एक थेंब ।।४।।
थांब शहाण्या सारखा
नको करू आता माती
साऱ्या बळीराजातर्फे
हात जोडून विनंती ।।५।।