STORYMIRROR

Sheetal Sankhe

Romance

4  

Sheetal Sankhe

Romance

कविता

कविता

1 min
142

तुझ्या सोबत असून ही नसते ना ...

तेव्हा तीळ -तीळ तुटते मी


तुझ्या सहवासाची ज्योत तेवत असते ना...

तेव्हा त्या प्रकाशात दिसते मी ...


तू सारून तो प्रकाश निघतोस ना...

तेव्हा काळजात धस्स होते मी...


तुझ्यातून मजपर्यंत अंतर पार करते ना...

तेव्हा खरं तर तुझ्यात मुरत जाते मी...


अंधार होता -होता भरवसा देत नाहीस ना...

तेव्हा त्या अंधारातच गुडूप होते मी...


प्रतिक्षेची कवच कुंडल माळून घेते ना...

पण, कुठवर माळावी ती कुंडले हे शोधते मी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance