STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others Children

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others Children

आशा

आशा

1 min
273

 आशाची निराशा

कधी नाही व्हावी

प्रयत्नाला थोडी

पालवी फुटावी....!!


आशेवरी जगा

ध्येयाचा रे ध्यास

प्रयत्नाने गाठू

आपला प्रवास.....!!


भुकेला ओळखा

तहानेला जाणा

माणुसकी थोडी

अंगात रे आणा......!!


माय ती मरावी

मरू नये आशा

प्रत्येकाच्या मनी

असे अभिलाषा.....!!


रित्याच हाताने

जाऊ नये कोणी

भिक्षेकरी दारी

पाजवा वा पाणी....!!


मुखात ठेवावी

सदा गोड वाणी

गावी कधीतरी

मंजुळ ती गाणी.....!!


इतरांच्या कामी

पडा कधीतरी

कष्टानं कमवा

नको दुःख उरी....!!


स्वाभिमान ठेवा

घडो देशसेवा

कोणासही वाटो

तुमचाच हेवा......!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational