बालपणीच्या आठवणी
बालपणीच्या आठवणी
पुन्हा ती वेळ यावी असे
आज ही मनोमन वाटते
बालपणीचा काळ सुखाचा
परत बालपणात जावे वाटते
आजही आठवते बालपण
तोच निरागस चेहरा हसरा
घरात आला खाऊ की वाटे
नसावा कोणी त्यात दुसरा
घरात होतो मी शेंडेफळ
माझ्यावर भाऊ दोन बहिणी
आईजवळ रडून रडून सदा
मिळवत पाच पैशाची नाणी
शाळेला जायचा खूप कंटाळा
गल्लीगल्लीत खेळायचो खूप
उन्हातान्हात खेळून खेळून
माझे बदलून जायचे रूप
रविवारी घरात कमी बाहेर जास्त
आवडता खेळ क्रिकेट खेळायचो
रात्रीला पोटभर खाऊन मग
पंखा लावून ढाराढुर झोपायचो
खेळण्याच्या नादात राहून जायचा
शाळेचा अभ्यास नि गृहपाठ
आईसोडून सारेच बोलायचे
शाळेत छडीसोबत पडायची गाठ
मोठा होत गेलो शहाणा झालो
खेळ सोडून अभ्यास लागलो करू
वाचन लेखनाचा छंदामुळेच
आयुष्य आनंदात लागलो जगू
