STORYMIRROR

Anagha Kamat

Others

4  

Anagha Kamat

Others

माझी सावली

माझी सावली

1 min
276

ती माझ्याबरोबरच असते 

मला ती कधींच सोडत नसते 


कधीं इथे कधीं तिथे 

सतत सोबत करत असते 


सकाळ झाली तरी बरोबर 

दुपारची ती चालते भिंतीवर 


कधीं लहान तर कधीं मोठी होते 

मी करते तींच कामं ती करते 


मी वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालते 

पण ती काळींच वस्त्रं परिधान करते 


कितीही मारलं तरी तिला नाहीं लागत 

काही बोलले तरी तिला नाही बाधत 


मी हातवारे केले तरच ती करते 

नाहीतर खरंच ती गप्पच राहाते 


कधीं ती पुढून लांबच लांब होते 

कधीं ती मागून अगदी छोटी होते


बरोबर येऊं नको म्हटले तरी ती येते 

जेव्हां मी झोपते तेव्हां ती दबून जाते 


प्रकाशांत ती लोकांना दिसते 

काळोखात ती गायबच होते 


अहो,ती माझी सावली आहे.

आणि माझ्या बरोबर आहे.


Rate this content
Log in