कोरोनाचं भूत
कोरोनाचं भूत

1 min

192
बायको म्हणाली नवऱ्याला
जाऊ या आम्ही जत्रेला
मुलाबाळांना कडेवर घेऊन
फेरीत चक्कर मारू या
नवरा म्हणाला बायकोला
बरं वाटतं नाही मला
फेरीत जायचं मास्क घालून
त्यापेक्षा घरीच बसू या
बायको म्हणाली नवऱ्याला
कंटाळा खरं येतो मला
सारा दिवस काम करून
थकवा आलेला घालवू या
नवरा म्हणाला बायकोला
कोरोना आतां परत आला
बाहेर जाणं येणं कमी करून
काळजी आम्ही घेऊ या
बायको म्हणाली नवऱ्याला
मान देते मी तुम्हाला
कोरोनाच्या भुताला मारून
नंतर कधीतरी जाऊ या