लग्न
लग्न


एकदा रावस म्हणाला पापलेटला
किती अजब तुझी ही अदा
म्हणावं वाटतं तुला पाहून
जीव तुझ्यावर झाला फिदा
पापलेटला झाला आनंद खूप
रावसाशी तिला वाटलं करावं लग्न
पापलेटनं घेतलं मनावर, राहून चूप
पण तेव्हापासून झाली कामात मग्न
लग्नाची कामे त्यांनी वाटून दिली
भटजीमामा केला बारीक बोंबिलाला
डेकोरेशनची कामे सरंग्याकडे सोपविली
कानपिळ्याचा मान मात्र बांगड्याला
वाटोळी कोलंबी करवली झाली
वाजंत्री झाले मांसाळ सौंदाळे
जेवणाची तयारी सुरमईने केली
खेकडे पण आले काळे काळे
रंगित अक्षता वाटल्या तारल्यांनी
भटजीमामांनी म्हटली मंगलाष्टके
रावसाचे व पापलेटचे लग्न झाले
सर्वांनी त्यांना शुभाशिर्वाद दिले