आभासी दुनिया
आभासी दुनिया
वास्तवाशी नाळ सोडून जगतोय स्वप्नात
मन नेहमी गुंतून राहते आभासी दुनियेत
पूर्वी असा मी कधीच वागत नव्हतो
सगळ्यांसोबत नेहमी बोलत होतो
आता एकटाच राहतो बसून कोपऱ्यात
मन नेहमी गुंतून राहते आभासी दुनियेत
मैदानावरचे अनेक खेळ गाजवले होतो
एक क्षण देखील दारात बसत नव्हतो
आता घरकोंबडा होऊन बसलो घरात
मन नेहमी गुंतून राहते आभासी दुनियेत
घराच्या बाजूचे जिवलग मित्र होते चार
सारेच जीवाला जीव लावणारे होते फार
आताचे हजार मित्र उपयोगी नाही संकटात
मन नेहमी गुंतून राहते आभासी दुनियेत
पूर्वीचा काळ नि पूर्वीचे क्षण चांगले होते
सारेच वास्तवातील जीवन जगत होते
कुणी ही भेदभाव करत नव्हते परक्यात
मन नेहमी गुंतून राहते आभासी दुनियेत
मित्रांशी चॅटिंग करतो तासनतास फोनवर
घरातल्या लोकांशी बोलत नाही क्षणभर
वेळ-काळ कळेना मोबाईलच्या संगतीत
मन नेहमी गुंतून राहते आभासी दुनियेत
