हासू खेळू
हासू खेळू
छोटे छोटे मुलं आम्ही
खूप खूप हासू खेळू
पावसात भिजण्यास
सदा अंगणात पळू...!
पाण्यामध्ये नाचताना
येते खूप खूप मजा
सर्दी होईल म्हणून
कधी आई देते सजा...!
गात राहू नेहमीच
आम्ही गाणे छान छान
पावसाला आठवत
देऊ अभ्यासाला ही मान...!
बालपण आमचे हे
खेळण्यामध्येच मन
नको आम्हाला आता
कोणते नवीन सण...!
आम्ही बाल मित्र मैत्रिणी
येते खूप मजा भारी
भांडले जर कुणी तर
निघून जाते मजा सारी...!
