STORYMIRROR

dipali marotkar

Abstract Inspirational

3  

dipali marotkar

Abstract Inspirational

सुख

सुख

1 min
212

सुख दुःख येता जीवनी

आयुष्य यालाच म्हणावे

गेलेले दिवस विसरून

जीवन आनंदमयी जगावे..!


सुख आणि दुःख आहे

साथी हेच जन्म मरणाचे

वाईट दिवस असले तरी

चांगले येईलच उद्याचे..!


प्रत्येकालाच हवे असते

सुखाचे दिवस जीवनी

वाईट विचार सोडूनिया

चांगले विचार करावे मनी..!


दुसऱ्यांच चांगले व्हावे

असावी नेहमी भावना

तेव्हाच होणार ही पूर्ण

आपली सुखाची कामना..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract