निवृत्ती
निवृत्ती
आठवतो मला माझ्या सरांचा सहवास,
जेव्हा शिकवायचे मला सर माझे खास..!
सहवासात राहून त्यांच्या मी शिकली,
आज मला त्यांची निवृत्ती आठवली..!
शिकवत असतांनी सर रमून मी जायची,
त्यांचा विषय लागताच मी मग्न व्हायची..!
आज पण माझे शिक्षक मला खूप आठवतात,
शिकवणे आठवले की डोळ्यात पाणी साठतात..!
मला मिळावे नेहमीच या सरांसारखे शिक्षक,
शिक्षकांमुळे व्हावे माझ्या जीवनाचे सार्थक..!
अनुभवाचे बोल कसे असतात कळले
आज त्याच शिक्षकांमुळे विद्यार्थी घडले..!
हारणे आणि जींकणे यात काय फरक असतो
आपल्यातील चांगलेपणा इतरांना दिसतो..!
सरांनी पार पाडली परिपूर्ण सेवा आपली,
वृत्ती चांगली ठेवून कार्यास निवृत्ती दिली..!
