बाळ
बाळ
गोरे गोजिरवाणे हे बाळ
आहे खूप खूप शहाणे
हसू गालामध्ये दळले
दिसते किती केविलवाणे..!
आनंद येतो हो सर्वांनाच
बघताच बाळाचे हे रूप
मनामनात हर्ष दाटतो
लाडवावे बाळास खूप..!
असलेले दु:ख विसरून
मन होते हर्षित हे माझे
जेव्हा बघते डोळ्यांनी
बाळा नाजूक रूप तुझे..!
ऐकुनी आवाज बाळाचा
वाटते मज त्यास भेटावे
जवळ घेऊन आनंदाने
कुशीत माझ्या खेळवावे..!
हे गोंडस बाळ बघताच
सुख माझ्या जवळ आले
बाळाचे हसरे रूप माझ्या
आठवणीत सदा राहिले..!