लिहा असं की ...
लिहा असं की ...


लिहा असं की, ते आतून आलं पाहिजे ...
मनातलं सारं... लेखणीतून साकारलं पाहिजे ..
अंतरीची उमाळा .. कागदावर उतरवताना ...
समाधिस्त अवस्थेतून प्रतिबिंबित झाला पाहिजे ..
.
बेभान होऊन .. मोर मनीचा थयथय नाचला पाहिजे
प्राण कंठात आल्यागत जीव कळवळला पाहिजे ..
तीच ओढ .जुनीच खोड नव्याने अवतरली पाहिजे
मनातील सल लेखणीतून सहजच पाझरली पाहिजे
भक्तासारखा समर्पण भाव , वेदनेचा गाव त्यात दिसला पाहिजे
नवं रसाचा अर्क जणू ..त्यात ठसठशीत असला पाहिजे
समाज मनाचा आरसा त्यात हुबहू उमटला पाहिजे ..
रसिक मनाचा ठाव तो त्यांचाच जीवनपट असला पाहिजे .
..
लिहा असं की , लिहताना तुम्हाला आनंद झाला पाहिजे
वाचकाला त्या अनुभवाने मुळासकट हादरून सोडला पाहिजे ...
अक्षरा - अक्षरातून मानवतेचा सुगंध अखंड दरवळला पाहिजे
मानवाप्रतीची अपार करुणा संतसाहित्यागत अजरामर ठरली पाहिजे
लिहा असं कि तुम्हीच व्हा समाजसुधारक , तारणहार , भाग्यविधाते
संधीसाधू नेते , मुजोर प्रशासक ,,उदासीन मते सर्वकाही बिघडलेले ...
विसरुनी सारी व्यर्थ भ्रमंती ,सर्वंकष क्रांतीची मशाल घेऊया हाती
लेखणीच्या टोकावर तरेल गड्यानो ! खऱ्या अर्थाने ही संबंध धरती ....