एकांत दे गा देवा
एकांत दे गा देवा
एकांत दे गा देवा, नाही होत सहन
मनी येती विचार, येवो मज मरण
सेवा घडली मज, तीच माझी पुण्याई
जन्म देणारी माझी, धन्य तीच आई..!
आधार नाही मला, आपल्याच व्यक्तींचा
खोटा डाव आहे आता, येथे सर्व नियतीचा
एकांतात राहूनच, आठविल तुझे रूप
कंटाळली देवा, मी या जीवनाला खूप..!
तुझ्या नामस्मरणात, होऊ दे मला दंग
लाभावा फक्त देवा एकांताचाच संग
कोणी नाही माझं, कळलं आता मला
आली तुला शरण, एकांतात राहायला..!
नको काही आता, मागणे माझे तुला
एकांत देऊनिया मुक्त कर तूच मला
शोधू कोठे कोणास, नाही माझं कोणी
म्हणूनच देवा आली तुझ्या रे चरणी..!
साक्षात आहे तुच देव खरा परमेश्वर
माझी भक्ती राहिल कायम तुझ्यावर
दाखव आशा मज, एकांत देईल तुला
तुझ्या नामातच खूप आनंद वाटेल मला..!
