STORYMIRROR

dipali marotkar

Inspirational

3  

dipali marotkar

Inspirational

माझा देश

माझा देश

1 min
801

माझा देश माझ्यासाठी

जगण्याची आहेत शान

मला राहिल नेहमी माझ्या

मातृभूमीचा अभिमान..!


जन्म झाला माझा येथे

याच माझ्या भारत देशात

थोरपुरूष घडले येथेच

आपण जगतो आरामात..!


खूप बजावली कामगिरी

दुःख केले सर्वांनी सहन

याच आपल्या भारतात

वीर सैनिकांचे गेले जीवन..!


देशासाठी लढले सदैवच

स्व-खुशीने त्यागीले प्राण

कर्तव्याची जाणीव ठेवून

भारत देश बनला महान..!


माझ्या भारत मातेसाठी

जयघोषाचे गातात नारे

आम्हाला वाटे अभिमान

आम्ही आहे भारतीय सारे..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational