दुःख
दुःख
सुख वेचता वेचता आले
दुःखच माझ्या वाट्याला
होते तेच क्षण सुखाचे मी
गमावले एकाच वेळेला..!
आहे त्यात समाधानीचा
नवीन धडा मला मिळाला
सुखाच्या शोधात राहून मी
दुःख दिले माझ्या मनाला..!
अनुभव घेताच आयुष्यात
सुख दुःख असे कळू लागले
माझ्या मनात दुःखाचे नवे
वादळ कोसळतच चालले..!
जीवन बनले वाईट माझे
समाधान मी शोधत गेली
जास्त अपेक्षा केली म्हणून
दुःखाची लाट नशिबी आली.!
