संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर । निवृत्ती सोपान
भावंडे लहान । मुक्ताबाई।।१।।
माय बाप त्यांचे । संपले देहांत
लाभला एकांत । लेकरांना।।२।।
टाकले वाळीत । तोडले संबंध
प्रेमभाव गंध । संपलेला।।३।।
ज्ञानेश्वरी ग्रंथ । ज्ञानोबा माऊली
सर्वांची सावली । ठरलासी।।४।।
साऱ्या जीवांसाठी । हे पसायदान
असे विश्वभान । शब्दोशब्दी।।५।।
आध्यात्मिक संत । अनेक अभंग
वारकरी दंग । असायचे।।६।।
हरिपाठ त्यांचे । आहे खूप छान
ऐका सर्वजण । आवडीने।।७।।