मृध गंध पावसाचा
मृध गंध पावसाचा
निशब्द रे माझ्या मना,सांग मज तू
आज का रे तुज,काहीच कसे कळेना...
स्वप्नवत सारा भासे,निसर्गाचा अबोल पसरा
छेडतो बघ ना कसा,आज हा मज उनाड वारा
मन ही धावे त्याच्याच संगे..कधी,कसे मलाच कळेना..
मोरपंखी हिरवळीचे,मखमली सुरेख गालिचे
पांघरले शेले त्यांनी,खुल्या निळसर आभाळाचे
नदी,ओहोळ,अन् झऱ्यांनी,शृंगार केले शुभ्र मोत्याचे
अन् धबधब्यातून ही ऐकू येती,नाद मधुर सप्तसुरां चे
धुंद बावरे मन हे माझे....थांब रे एका क्षणाला
आज असे सोबतीला, मम प्रिय सवंगड्यांचा मेळा
पावसासंगे,मैत्रीचा हा...अहो असे नादच खुळा
सांग रे निशब्द मना,आज तुज काहीच कसे कळेना...
