मृध गंध पावसाचा
मृध गंध पावसाचा
उष्माच्या धारा नीं ,झाली तिची काहीली
मेघाच्या त्या वर्षावाने,धरा बघा आनंदली
पहिल्या वहिल्या पावसाने,ती ही आज मोहरली
अंगणात फिरूनी, चिंब चिंब चिंब भिजली
प्रियकराच्या येण्याने,जशी प्रेयसी लाजली
तारुण्याच्या उंबरठयावर,जराशी विसावली
गालावरची लाली जणू,तिची तिलाच कळली
नजरानजर होताच,पापणी हळूच झुकली
प्रेमाची कबुली,तिच्या लज्जेत दिसली
अन् त्याच्या नजरेत,ती नकळतच गुंतली
वाऱ्यासवे त्या झुल्यावर,आनंदाने झुलली
निसर्गाचे रुप पाहून, कळी तिची खुलली
मखमली हिरवळीवर,आता ती सुखावली
पहिल्या वहिल्या पावसाने,ती चिंब चिंब भिजली....
