सर्वच जगून जातात
सर्वच जगून जातात
मेळ मिलाफ होते
म्हणून जीव जन्माला येतो
अन् छाप आपली उद्भवून इथं
बीज चक्राचे सोडून जातो
या निर्मितीचा भाग तो
त्या भागाला अदा करावे लागते
कधी सुखाचे कधी दुःखाचे
या घडीला त्या घडीत घटित करण्याचे
अशी जगण्याचं क्रिया ती
प्रक्रिया नवं नवीनीची
भेट घडून बदल आलेली
गुंतून प्रेमात पावन झालेली
शोध घेतं रूपात सामावते
बहरून काही काळातून
'डोल डुलत जिणं प्रवास
ओळख ओळखत चाललेलं
असं कालचक्र प्रवाहात
सर्वच जगून जातात
अनुभूतीच बोल घेतं
बदलाचे कारण ठरून
