STORYMIRROR

Prakash Chavhan

Romance

3  

Prakash Chavhan

Romance

प्रेम बोलतं रें प्रेम बोलतं

प्रेम बोलतं रें प्रेम बोलतं

1 min
269

प्रेम बोलतं रें प्रेम बोलतं 

गालात हसून इशारा करतं 

आपलंच ते आपल म्हणून  

घोट आनंदाचे पिऊन पाजतं 


प्रेम बोलतं रें प्रेम बोलतं 

बघुनी मला ते काम करतं 

सावली देऊन ओलावा देत 

जिवलग अंकुर नातं वाढवतं 


प्रेम बोलतं रें प्रेम बोलतं 

सोसून चालत जपून काही 

श्वास मले देऊन भरतं 

या जगण्यात त्या उडण्यातं 


प्रेम बोलतं रें प्रेम बोलतं 

काट्याकुट्यातून मार्ग बनवत 

घेऊनी लाडानं ते पुढे चालतं 

कुरवाळून मनवामधी घास भरतं 


प्रेम बोलतं रें प्रेम बोलतं 

निरस वाळवंट हिरवं करतं 

शब्द जिव्हाळ बरसून येते 

डोल डोलत तहान भागवतं 


प्रेम बोलतं रें प्रेम बोलतं 

उघड तन झाकून घेतं 

कितीही वाजली थंडी तरी 

ऊबदार मिठीत घेऊन बसतं 


प्रेम बोलतं रें प्रेम बोलतं 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance