STORYMIRROR

Prakash Chavhan

Romance

3  

Prakash Chavhan

Romance

ती भेटते

ती भेटते

1 min
354

ती भेटते 

दररोज मला 

हृदयात येऊन 

प्रेमानं उठवत 


दिवा उमेदीचा 

लावून जात असते 

की जगत बघून घे 

प्रवास हा वेळे वेळचा 


आनंद दुःखाकडे 

दुःख आनंदाकडे 

एकमेकांकडे जात 

भुलवणी करत 


जगवत असते 

तू मात्र भुलू नको 

आपल्याला परत 

मूळ रुपासी भेटायचंय 


हा तर प्रवास आहे 

आनंद घेऊन चाल 

मग ते कश्यात ही असो 

सुख दुःखातलं


प्रेम मिळवत प्रेमाकडे 

भावनांच सागर पार करून 

पवित्र ज्योत लावत 

हा आनंद तिथे पण नेऊन 


आत्म आत्मज्ञानातं 

प्रेम प्रकाशित करून  

विश्व विश्वात ही दिवाळी 

पोहचून साजरी करूयात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance