STORYMIRROR

Prakash Chavhan

Abstract

2  

Prakash Chavhan

Abstract

लावूनी प्रेम या जगण्याला

लावूनी प्रेम या जगण्याला

1 min
59

लावूनी प्रेम या जगण्याला

जग चाललंय जुळवूनी मन 

कुणी होऊनिया मग्न मस्त 

नाचतोय तालात वेळेच्या ठेकेवर


वाजतोय धुं धुं करत 

कधी इथल्या तिथल्या पुढ्यात 

फिरतोय फांदी फांदीवरती

कामाच्या झाडावर खेळूनीया 


घेऊनी मचधार परंपरेची

वाहतोय गाळ तळाच

बसत कुठे सुपीकतेला 

बघतोय नवं मार्ग निघण्याच


पुन्हा वसण्यासाठी लिहितो वाट 

बदलून काळोकाळी वस्त्र रूपाचे 

लढत युग युगाशी युद्ध झाले मोठे 

पत्करून मरण शांती वसवली 


लावूनी प्रेम या जगण्याला 

कुणी संत झाले कुणी पंथ 

शिकवूंनी ज्ञान जनमाणसास 

आत्मबल वाढवूनी थोर झाली


दिशा देत मानव माणुसकीस 

अज्ञानात ज्ञान प्रकाशित करून

वाहते ही नदी अनमोल जीवाची 

सार्थक होऊन पिढ्यानं पिढी आली 


लावूनी प्रेम या जगण्याला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract