कवडसा
कवडसा
कवडसा मनाचा
स्वच्छच ठेवतसे
तरी का बरं असा
धूसर दिसतसे
अपमानाचे शल्य
तयावर साठते
किती पुसू म्हटले
तरीही ना जमते
बोचरे हे वाग्बाण
डंख तया करती
काढूया म्हणूनही
मुळीच ना निघती
हलकीशी फुंकर
मायेच्या माणसानी
कवडसा उजळे
हास्याच्या लकेरींनी
प्रेमाची शाबासकी
मळभ दूर करी
कवडसा मनात
निर्मळ हास्य करी
